व्हीएस न्यूज – पुनावळेतउघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून साडेचार लाखांचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुदळे फार्म येथे घडली.याबाबत, सत्यवान कुदळे (वय-31, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुदळे यांचे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घर उघडे होते. उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.