व्हीएस न्यूज - लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शेतकरी, कामगार, महिला व युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा देशात प्रथम क्रमांकावर येईल. असा विश्वास युवकांमध्ये निर्माण झाल्याने पिंपरी चिंचवड मधील युवा सेनेच्या शंभराहून जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. अशी माहिती राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल शंकर वाकडकर यांच्या अभिष्टचिंतन मेळाव्यात मंगळवारी (दि. 3 एप्रिल) वाकड येथे झालेल्या कार्यक्रमात युवा सैनिकांनी प्रवेश केला. यावेळी वाकडकर यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात भोसरी आणि चिंचवड येथे होणा-या हल्लाबोल आंदोलनात भाजपा, सेना, मनसे आणि आरपीआय मधील हजारों कार्यकर्ते, महिला व पदाधिकारी लोकनेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. आगामी काळात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने राज्यात राबविलेली चुकीच्या धोरणांना तीव्र विरोध करु. तसेच पिंपरी चिंचवड मधील अन्यायकारक शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, चोविसतास पाणीपुरवठा, कचरा डेपो समस्या, शहरात घटणारे रोजगारांचे प्रमाण आदी प्रश्नांवर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांचे वाकडकर यांनी श्रीफळ देऊन स्वागत केले. यामध्ये युवा सेना पिंपरी चिंचवडचे सरचिटणीस पंकज चोपदार, उपाध्यक्ष शुभम काळे, उपाध्यक्ष कुणाल रावडे, सरचिटणीस सुरज उंबरकर, सांगवी प्रभागमधील विरेंद्र हेगडे, कुणाल वाघमारे, हर्षद म्हेत्रे, शेखर स्वामी,ऐश्वर्या देशपांडे तसेच डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयातील युवा सेनेच्या पदाधिका-यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप लाला चिंचवडे, उपाध्यक्ष विशाल पवार, मयूर जाधव, सरचिटणीस चैतन्य चोरडीया, सतीश कोकाटे, योगेश मोरे, अमेय नेरूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002