व्हीएस न्यूज - तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार निगडीपरिसरात सोमवारी रात्री घडला.याबाबत एका 18 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्याततक्रार दाखल केली आहे. यावरून राजेंद्र सुरेश पवार (वय 19, रा. ओटा स्कीम, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरातील सामान आणण्यासाठी बाजारात गेली. राजेंद्र याने तिचा पाठलाग करून तिला ओटा स्कीम येथील स्मशानभूमीजवळ बोलावले. तरुणी स्मशानभूमीजवळ गेली असता, तू मला आवडतेस, चल गाडीवर बस आपण पळून जाऊ. असे म्हणत तिच्या अंगावर हात टाकला. घडलेल्या प्रकाराला तरुणीने नकारदेत घरी सांगेन असे म्हणाली. यावरून राजेंद्र याने कोणाला काही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.