व्हीएस न्यूज - सध्या श्यामची आई दिसत नाही, त्यामुळे श्यामही दिसत नाही. पुर्वीची आई भोळी भाबडी, अशिक्षित होती. पण ती प्रेमाचा सागर होती. सध्याची आई स्मार्ट, सुशिक्षित आणि पगारदार आहे. तिचा पोषाख पूर्णपणे आधुनिक असल्याचे मत भाऊसाहेब कोकाटे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधीच्या प्रतिमेस माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बी.आर. माडगूळकर, तात्यासाहेब सपकाळ आदी उपस्थित होते.
माणसाच्या जीवनात आईचे महत्व अपूर्व आहे. ईश्वराला सर्व घरात पोहचता येणार नाही म्हणून त्याने घरा-घरात आई निर्माण केली आहे. आई ही ईश्वराचे स्वरूप आहे, असे मत माडगूळकर यांनी व्यक्त केले. यावेळी थोर समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पंडीत भोसले यांनी सुत्रसंचालन केले. उल्हास झिरपे यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002