व्हीएस न्यूज - बंद बंगल्याचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरातील कपाटातून 8 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना 24 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान निगडी प्राधिकरण येथे घडली.याप्रकरणी, राजकुमार मित्तल (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारहे आपल्या परिवारासह 24 मार्चला घरगुती कामासाठी बाहेरगावी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील 8 लाख 23 हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले. मित्तल मंगळवारी गावावरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.