व्हीएस न्यूज - महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरतुद करून दोन्ही प्रकल्पाला गती प्रदान करण्यास महत्वाची भूमिका केंद्र सरकारने निभावली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी रुपयाची तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पातुन जाहीर केली आहे. दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी एकंदरीत २८२९ कोटी रुपये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.
याआधी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ३१० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मागील आर्थिक वर्षात नागपूर मेट्रो प्रकल्पाकरिता २६० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता ११० कोटी रुपय मंजूर करण्यात आले होते. एकंदरीत मागील वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात राज्य सरकारने दोन्ही प्रकल्पाना मिळून ७० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १५०७ कोटी रुपयापैकी २७९ कोटी रुपये इक्विटी अंतर्गत, १८५ कोटी रुपये सबोर्डिनेटेड डेट (एसडी) – केंद्र सरकार तर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्ताने आणि उरलेली १०४३ कोटी रुपये केएफडब्ल्यू आणि एएफडी तर्फे कर्जस्वरूपात प्राप्त होतील. तसेच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १३२२ कोटी रुपयापैकी २५० कोटी रुपये इक्विटी अंतर्गत, १६९ कोटी रुपये सबोर्डिनेटेड डेट (एसडी)- केंद्र सरकार तर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्याने आणि उरलेली ९०३ कोटी रुपये ओव्हर सिझ डेव्हलपमेंट असिस्टंस (ओडीए) कर्जस्वरूपात मिळतील.
गेल्या वर्षी २०१८-१९ या आर्थिक वर्षात सादर झालेल्या अर्थ संकल्पात नागपूर आणि पुणे अश्या दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १३५० आणि ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थ संकल्पात नागपूर आणि पुणे अश्या दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १५७ कोटी आणि ८२२ कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002