Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
चऱ्होलीत दांम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या   

व्हीएस न्यूज - राहत्या घरात वायरने गळफास घेऊन एका दांम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या हत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी सव्वा तीन वाजता चऱ्होली येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे हे दांम्पत्य पंधरा दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते.

उत्तम तुकाराम सुर्यवंशी (वय-37) व मुक्त सुर्यवंशी (वय-31, रा. भोसले वस्ती, चऱ्होली, मुळ. परभणी) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. सुर्यवंशी दांम्पत्याला 1 सात वर्षांची मुलगी व 6 वर्षांचा एक मुलगा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यवंशी दांम्पत्य मुळचे परभणीचे असून 15 दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते. उत्तम सुर्यवंशी हे इलेक्ट्रेशियनची काम करत होते. गुरूवारी घरात कोणी नसताना सुर्यवंशी दांम्पत्याने वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना शेजाऱ्यांनी त्वरीत पालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
आमदाराच्या सुरक्षा रक्षकाला  मारहाण करत लुबाडले  !

व्हीएस न्यूजपिंपरी-चिंचवडमधील एका आमदाराच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करत त्रिकुटाने त्याच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून नेली. हा प्रकार नुकताच पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिsसच सुरक्षित नसलीत, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

याप्रकरणी शैलेश काळभोर (वय-36, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळभोर हे पोलिस शिपाई असून शहरातील एका मातब्बर आमदाराचे ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

याबाबत फौजदार अ. बी. शेटे यांनी माहिती दिली. फिर्यादी काळभोर गुरूवारी त्यांच्या गावी लोणी काळभोरला गेले होते. गावावरून परत येताना पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे पाठीमागून आलेल्या एका स्कॉर्पिओ मधील त्रिकुटाने त्यांचा स्वीफ्ट डिझायर मोटारीला स्कॅार्पिओ अडवी लावून त्यांना अडविले. स्कॉर्पिओमधील त्रिकुटाने काळभोर यांना विनाकारण मारहाण करत त्यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेली. तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
​​​​​​​गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नागरिक संघ मेट्रोपॉलीटन, चिंचवड यांच्या वतीने इयत्ता 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

चिंचवडगाव येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमाचे उद्‌घाटन डॉ. राजेंद्र कांकरीया, मोटार वाहन निरीक्षक शितल पवार, विठ्ठल भोईर, अनंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना फाईल फोल्डर, पेन, कॅलक्युटर, वही, मार्गदर्शन पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश जैन, मनद प्रसाद, श्रीकांत आंबेकर, संभाजी वाळके, प्रदिप पवार, कांतीलाल भंडारी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन खुशाल दुसाणे यांनी तर आभार शरद लुणावत यांनी मानले.

...Read More

V. S. News
ट्रक आणि टॅंकरच्या धडकेत दोघेजण जखमी

व्हीएस न्यूज - टॅंकरला एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात देहूरोड येथील सेंट्रल चौकात गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एक टॅंकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. देहूरोड मधील सेंट्रल चौकाजवळ टॅंकर आला असता अचानक चौकात दुसरा ट्रक घुसला. अचानक समोर आलेल्या ट्रकमुळे टॅंकर चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटला आणि टॅंकर समोरच्या ट्रकला मागच्या बाजूने धडकला. यामध्ये टॅंकरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक आणि क्लीनर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अचानक आडवा आलेल्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.

...Read More

V. S. News
हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून ट्रॅफिक वॉर्डनच्या मोटारीची तोडफोड

व्हीएस न्यूज - हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याने ट्रॅफिक वॉर्डनच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांना शिवीगाळ करत मोटारीची तोडफोड केली. हा प्रकार थेरगाव मधील बापूजी बुवा कॉर्नरवर गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास झाला.

बालाजी किसन सगर (वय 38, रा. इंद्रायणी नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर उर्फ विनोद सातपुते (रा. गणराज कॉलनी, थेरगाव) याच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगर ट्राफिक वॉर्डन म्हणून वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते आपल्या मोटारीने घरी जात होते. त्यावेळी बापुजी बुवा कॉर्नरला रस्त्याच्या मधोमध सातपुते हा त्याच्या तीन मित्रांसोबत बोलत थांबला होता. रस्त्यावरून जाण्यासाठी सगर यांनी हॉर्न वाजविला. त्यावरून सातपुते आणि सगर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. सातपुते याने त्याच्या तीन मित्रांना घेऊन सगर यांच्या मोटारीचा पाठलाग केला. मोटारीवर दगडफेक करून मोटारीचे नुकसान केले. मोटारीवर दगडफेक झाल्याने सगर यांनी मोटारीतून पळ काढला. त्यामुळे ते बचावले. पोलिस हवालदार एस. एस. रासकर अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
​​​​​​​लोणावळात 25 फूट खड्यात पडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

व्हीएस न्यूज कचरा डेपोवर कचरा वेचण्यासाठी गेलेली दोन मुले डेपोवर असलेल्या 20 ते 25 फूट खोल खड्‌ड्यात पाय घसरून पडून दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपो येथे गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

इम्रान उर्फ सोनू रफिक शेख (वय 14) आणि अस्लम इस्माईल मुजावर (वय-16, दोघेही रा. वाकसई, मुळ गाव उदगीर) असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले एकमेकांची मावसभाऊ आहेत. सोनू याचे वडील रफिक शेख हे कचरा डेपोमध्ये कचरा उचलण्याच्या ठेक्यामध्ये काम करतात आणि डेपोच्या बाजूलाच असलेल्या वाकसई चाळ येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मेव्हणीचा मुलगा असलेला अस्लम हा त्यांच्यासोबत लोणावळ्यात आला होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सोनू हा अस्लम याच्या सोबत कचरा डेपोमध्ये गेला होता. खड्याच्या जवळ गेल्याने दोघेही पास घसरून पाण्यात पडून त्यांचा बुडून मृत्यू झाला.

यातील इम्रान उर्फ सोनू याचा मृतदेह हा लगेच मिळून आला पण अस्लम याचा मृतदेह बराच वेळ सापडत नव्हता. अखेर अस्लम याला शोधण्यासाठी स्थानिक शिवदुर्ग मित्र या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 3.40 वाजता अस्लम याचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश आले. या मोहिमेत शिवदुर्गचे प्रविण देशमुख, अजय शेलार, सागर कुंभार, राजेंद्र कडु, आनंद गावडे, रोहित वर्तक, सागर पडवळ, दिनेश पवार, सुनिल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

...Read More

V. S. News
भाविकांच्या सुविधांमध्ये कसर करू नका 

व्हीएस न्यू- , ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळ्या जवळ आला आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी दिले.


आळंदी येथील प्रस्थान सोहळ्याचे आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रभारी तहसीलदार रवींद्र सबनीस, पालखी सोहळा समन्वयक उदयसिंह भोसले, समन्वयक तहसीलदार रुपाली सरनौबत, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वीज अभियंता सुभाष ढापसे, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, प्रतिभा गोगावले, सुनीता रंधवे, नगरसेवक सचिन गिलबिले, विभाग प्रमुख संघपाल गायकवाड, दत्तात्रय सोनटक्के, राजेश पवार, मंडलाधिकारी चेतन चासकर, शासकीय खात्याचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी समीर भूमकर या बैठकीस अनुपस्थित असल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माउली मंदिरातून 6 जुलै रोजी दुपारी चारचे सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या सोहळ्यात सुविधा उपलब्द करून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रांत प्रसाद यांनी विविध विभाग प्रमुख आणि शासकीय खात्याचे अधिकाऱ्यांना दिले. दिलेल्या नियोजनाचे प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे सूचना त्यांनी केल्या.


सोहळ्यात नागरी सुविधा, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा यंत्रणा, दर्शन बारी, पोलीस बंदोबस्त, भाविक आणि नागरिक तसेच परिसराची सुरक्षा यावर लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले. पाण्याचे टॅंकर, वाहन प्रवेश, पार्किंग, अतिक्रमण कारवाई, पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पास शिवाय वाहनांना प्रवेश देऊ नये असे प्रांत प्रसाद यांनी सांगितले.


भाविकांसाठी केरोसीन आणि इंधन, गॅस पुरवठा पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता महसूल प्रशासनाने घेण्याचे आदेश देण्यात आले. मध्यवर्ती नियंत्रण कक्षात सर्व प्रकारची माहिती विभाग निहाय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या 2 तारखेपर्यंत सर्व प्रकारची तयारी पूर्ण करून अंतिम आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
पाणी नमुने आणि उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच हॉटेल तपासणी करून दोषींवर कारवाईसाठी प्रस्ताव देण्याचे सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. रस्ते भाविक आणि नागरिकांना खुले राहतील याची दक्षता परिषदेने घेण्यास यावेळी त्यांनी आदेश दिले. यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
वीज पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता महावितरणने घेण्याचे आदेश देत संपर्क यंत्रणा सुरु राहील यासाठी त्यांनी सुनावले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला.
स्वच्छता गृहांची स्वच्छता, शहराची स्वच्छता, जंतुनाशके फवारणी, धुरीकरण यावर स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

...Read More

V. S. News
भाजप राजवटीत शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे 

व्हीएस न्यू - मुख्यमंत्री शहरात असताना भाजपाच्याच नगरसेवकाचा भरदिवसा खून होत आहे, शहरातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काय झाले? असा खडा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.
वाघेरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात 30 सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी 21 सभा तहकूब करण्याचा राष्ट्रीय विक्रम करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. अशीही मागणीही वाघेरे यांनी केली.


सर्व साधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे. स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत.


राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात 43 व्या क्रमांकावर फेकले गेले असून सत्ताधाऱ्यांनी याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

...Read More

V. S. News
फॅमिली ट्रिपचे पॅकेज देण्याचे सांगून फसवणूक 

व्हीएस न्यू- 'पश्चिम बंगालला जाण्यासाठी तुम्हाला फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो,' असे सांगून दोघांनी एका तरूणाची 25 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार प्राधिकरण येथे नुकताच उघडकीस आला.


अभिजीत कुलकर्णी (वय-36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांना मोबाईलव्दारे संपर्क साधून आरोपींनी फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो, असे सांगून खात्यावर 92 हजार रूपये भरण्यास भाग पाडले. आरोपींनी ट्रिपचे आयोजन केले नाही. त्यामुळे कुलकर्णी यांनी आरोपींकडे दिलेले पैसे मागितले. आरोपींनी 67 हजार रूपये दिले. परंतू, उर्वरित 25 हजार रूपये न देता फसवणूक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपळे-गुरवमध्ये गॅस गळती;  स्फोटात वृद्ध दांपत्य भाजले

व्हीएस न्यू- गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वृद्ध दांपत्य गंभीररीत्या भाजले आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. प्रभाकर नगरकर (वय 60) आणि आशा नगरकर (वय 58) अशी स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध पती-पत्नीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगरकर पिंपळे गुरवमध्ये ओम साई सृष्टी चौकात एका चाळीवजा घरात राहतात. त्यांचे घर एकाच खोलीचे आहे. मंगळवारी रात्री स्वयंपाक झाल्यानंतर गॅस सुरूच राहिला. जेवण झाल्यानंतर दोघेही झोपले. मध्यरात्री प्रभाकर लघुशंकेसाठी उठले. दरम्यान, गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यांना याबाबत कल्पना आली नाही. त्यांनी घरातील दिवा सुरू केला. त्यावेळी लिकेज झालेल्या गॅसचा स्फोट झाला. यामध्ये नगरकर दांपत्य गंभीररित्या भाजले.


घटनेची माहिती पावणेएकच्या सुमारास अग्निशमन विभागाला समजली. माहिती मिळताच तात्काळ वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. राहटणी अग्निशमन विभागाचे भाऊसाहेब धराडे, विकास नाईक, चिपळूणकर यांच्या पथकाने आग तात्काळ नियंत्रणात आणली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

...Read More

V. S. News
भुशी धरण ओसांडून वाहू लागले 

व्हीएस न्यू - पर्यटनाचे आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ओसांडून वाहू लागले. यामुळे धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद पर्यटक घेऊ लागले आहेत.


दोन आठवड्यापासून पर्यटकांना भुशी धरण भरण्याचे वेध लागले होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखिल पर्यटन धरणावर गर्दी करत होते. शुक्रवारपासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने मंगळवारी अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायकांची प्रतिक्षा संपवली व पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओसांडून वाहू लागले. धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर पाणी वाहू लागले आहे.


मागील आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. धरणावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
निगडीत विजेच्या धक्क्याने ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - रस्त्यावरून विजेच्या खांबाजवळून जात असताना एका ९ वर्षीय बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील ओटा स्कीम, निगडी येथे मंगळवारी (ता.२६) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

हरीओम विनायक नराल – (वय ९, रा.पंचशील हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटा स्कीम येथील अंकुश चौकातून रस्त्याने पायी चालला होता. तो विजेच्या खांबाजवळून जात असताना त्यास विजेचा जोरदार झटका लागला व तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला. मात्र त्यानंतरही या ठिकाणी विद्युत प्रवाह येत असल्याचे दिसून आले. यामुळे वीजचोरीतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी व्यक्त केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!