व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नागरिक संघ मेट्रोपॉलीटन, चिंचवड यांच्या वतीने इयत्ता 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
चिंचवडगाव येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र कांकरीया, मोटार वाहन निरीक्षक शितल पवार, विठ्ठल भोईर, अनंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना फाईल फोल्डर, पेन, कॅलक्युटर, वही, मार्गदर्शन पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश जैन, मनद प्रसाद, श्रीकांत आंबेकर, संभाजी वाळके, प्रदिप पवार, कांतीलाल भंडारी आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन खुशाल दुसाणे यांनी तर आभार शरद लुणावत यांनी मानले.