व्हीएस न्यूज - टॅंकरला एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात देहूरोड येथील सेंट्रल चौकात गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एक टॅंकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. देहूरोड मधील सेंट्रल चौकाजवळ टॅंकर आला असता अचानक चौकात दुसरा ट्रक घुसला. अचानक समोर आलेल्या ट्रकमुळे टॅंकर चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटला आणि टॅंकर समोरच्या ट्रकला मागच्या बाजूने धडकला. यामध्ये टॅंकरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक आणि क्लीनर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अचानक आडवा आलेल्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.