व्हीएस न्यूज ः पिंपरी-चिंचवडमधील एका आमदाराच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करत त्रिकुटाने त्याच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून नेली. हा प्रकार नुकताच पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिsसच सुरक्षित नसलीत, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याप्रकरणी शैलेश काळभोर (वय-36, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळभोर हे पोलिस शिपाई असून शहरातील एका मातब्बर आमदाराचे ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
याबाबत फौजदार अ. बी. शेटे यांनी माहिती दिली. फिर्यादी काळभोर गुरूवारी त्यांच्या गावी लोणी काळभोरला गेले होते. गावावरून परत येताना पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे पाठीमागून आलेल्या एका स्कॉर्पिओ मधील त्रिकुटाने त्यांचा स्वीफ्ट डिझायर मोटारीला स्कॅार्पिओ अडवी लावून त्यांना अडविले. स्कॉर्पिओमधील त्रिकुटाने काळभोर यांना विनाकारण मारहाण करत त्यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेली. तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002