व्हीएस न्यूज - शिक्षणामुळेच बहुजनांची प्रगती होईल व समाजात त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रतिष्ठा मिळेल. यासाठी तरुणांना उच्च शिक्षण व वैद्यकीय, अभियांत्रिकीचे व्यवसायिक शिक्षण मिळाले पाहिजे. म्हणून सरकारने देखिल अनुकूल धोरण राबविले पाहिजे या उद्देशाने स्व. मुख्यंमत्री वसंतदादा पाटील यांनी प्रशासन राबविले. वसंतदादा पाटील हे उत्तम प्रशासक आणि उत्तम संघटक असणारे बहुजन समाजातील व्यक्तीमत्व होते. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सहकार भूषण ही पदवी देण्यात आली होती. देशात महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात कायम प्रगतीपथावर असावे यासाठी त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले. या शब्दात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी स्व. वसंतदादा पाटील यांना अभिवादन केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त सांगवीतील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख,एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी माजी अध्यक्षा शामला सोनवणे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुदाम ढोरे,विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, शेषराव कसबे, भाऊसाहेब मुगूटमल, विश्वनाथ खंडागळे, किसन भालेकर, सनी कसबे, संदेश नवले, अजय खराडे आदी यावेळी उपस्थित होते.
पिंपरी – डॉ. यंग..
आहारकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव यामुळे हाडांच्या आचाराचे प्रमाण जास्त - डॉ. यंग गर्ल-ही
व्हीएस न्यूज - सकस आहाराकडे दुर्लक्ष, अन्न धान्यातून वाढत्या प्रमाणात शरीरात जाणारे हानीकारक रसायने आणि व्यायामाच्या अभाव, विकसित तंत्रज्ञानामुळे एकाच जागी जास्त वेळ बसून काम करण्याची चुकीची पध्दत यामुळे भारतीय नागरीकांमध्ये हाडांच्या, विशेषता ज्येष्ठ नागरीकांमध्ये साध्यांच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. यासाठी वयाच्या पंचेचाळीशीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार व व्यायाम करावा आणि नियमित आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे मार्गदर्शन दक्षिण कोरियातील जगप्रसिध्द सांधे शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. यंग गर्ल -ही यांनी केले.
संभाजी चौक निगडी प्राधिकरण येथील पॅन आर्थो हॉस्पिटल मध्ये दि. 2 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत मोफत अस्थिरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर्थोस्कोपी तज्ञ डॉ. उमेश जाधव, सांधेरोपण तज्ञ डॉ. राहूल बोंद्रे, पेड्याट्रिक आर्थो सर्जन डॉ. मंदार आचार्य, हॅण्ड व मायक्रो व्हॅस्कूलस सर्जन डॉ. प्रशांत, पेन मॅनेजमेंट तज्ञ डॉ. विशाल मोहिते आदींसह शिबिरात सहभागी नागरीक उपस्थित होते.
डॉ. यंग गर्ल -ही यांनी अत्यंत अवघड अशी ज्येष्ठ नागरिकाची सांधेरोपण शस्त्रक्रिया केली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे या शस्त्रक्रियेबाबत इतर डॉक्टरांना मार्गदर्शन केले. या शिबीराचा सुमारे 520 रुग्णांनी लाभ घेतला. डॉ. डॉ. यंग गर्ल -ही मार्गदर्शन करताना म्हणाले की, हाडांचे आजार होऊ नये म्हणून प्रत्येक गरोदर महिलेने आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थाचे प्रमाण वाढवावे, बाळाच्या सकस आहारामध्ये दूध, दही, अंडी, पालक, नाचणीचा समावेश करावा. तरुणपणात मैदानी खेळांसह आवश्यक तेवढा व्यायाम करावा. वयाच्या पंचेचाळीशीनंतर सर्वांनी हाडांची ठिसूळता तपासून घ्यावी. विशेषत: महिलांनी ऑस्टिओस्पोरोसिस बाबत माहिती जाणून घेऊन दक्षता घ्यावी. असे मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये खांदा व गुडघ्यांची दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, स्पोर्टस् इंज्युरी, वारंवार निखळणारा खांदा, रोटेटर कफ टेयर, लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन, मनगटाची दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, जन्मजात व्यंग, सेरेब्रल पाल्सी, क्लबफूट, खुबा व गुडघे रोपण शस्त्रक्रिया, स्लिप डिस्क, मानदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, फ्लॅट फूट, आर्थरायटिस आदी आजारांबाबत तपासण्या व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
व्हीएस न्यूज – रहाटणी, शास्त्रीनगर, नखातेवस्ती परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असून महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याविरोधात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महिला वर्गाकडून बांगड्यांचा हार घालण्याचा इशारा शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या वतीने शहर प्रमुख युवराज दाखले यांनी दिला आहे.
त्यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेतील अधिकारी मुजोर झाले आहेत. गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याऐवजी राजकीय नेत्यांची व ठेकेदारांची चमचेगिरी करण्याची सवय त्यांना लागली आहे. शास्त्रीनगर, नखाते वस्ती, रहाटणी परिसरातील महिला दूषित पाण्यामुळे त्रस्त आहे. त्यातच काही भागात विस्कळीत स्वरुपाचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करुनही जाणून-बुजून कानाडोळा केला जात आहे. निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना सामान्यांच्या प्रश्नांचे काहीही देणे घेणे नाही. पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक 4 (ब) मधील भाजपाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य लक्ष्मण धोंडू उंडे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत माहिती दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार देवून नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण धोंडू उंडे यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार म्हणून वसंत नाथा रेंगडे यांनी रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत लक्ष्मण धोंडू उंडे यांनी नगरसेवक पदावर विजय संपादन केला आहे.
लक्ष्मण उंडे यांनी नं.84/2 ब शिवगणेश कॉलनी रोड नं-1 साई पार्क दिघी या पत्त्यावर अनधिकृत बांधकाम केलेले असून त्या घरात वास्तव्य करीत आहेत. परंतु, त्यांनी निवडणूक आयोगाच्या शपथ पत्रात पत्ता बदलून तो प्लॉट नं-31जयगणेश अपार्टंमेंट सर्व्हे क्रमांक 84 साई पार्क असा दिलेला आहे. त्यामुळे वरील अनधिकृत बांधकाम हे त्यांनी स्वतः बांधलेले असताना त्यांनी माहिती दडवित निवडणूक आयोगाची फसवणूक करुन खोटी माहिती सादर केलेली आहे. हे अनधिकृत बांधकाम उमेदवारीसाठी बाधक ठरणार असल्याने सदरील मिळकत त्यांनी मुलगा दीपक लक्ष्मण उंडे यांच्या नावावर हस्तांतर केला. मात्र, शपथ पत्रात त्यांनी मुलगा कमविता नसून तो माझ्यावर अवलंबून असल्याचे सांगून शपथपत्रात अवलंबित-2 च्या रकान्यात दीपक उंडेच्या नावावर मिळकतीचा उल्लेख केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अनधिकृत बांधकामामुळे नगरसेवक पद्द करणार असल्याचे नमूद केल्याने नगरसेवक उंडे यांनी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी पळवाट शोधली आहे. या अनधिकृत बांधकामाला सर्वस्वी नगरसेवक उंडे स्वतः जबाबदार आहेत. निवडणूक काळात त्यांनी निवडणूक आयोगासह महापालिका व जनतेची फसवणूक केली आहे. तसेच त्यांनी जोडलेल्या शपथपत्रातही बांधकामाची टॅक्स पावती, पालिका आरोग्य निरीक्षकांचा सर्च रिपोर्ट, शौचालयाचा दाखला यांचे दस्ताऐवज पुरावे म्हणून देण्यात आलेले आहेत. दरम्यान, नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे नगरसेवक पद करुन त्यांच्या कारवाई करावी, अशी मागणी वसंत नाथा रेंगडे यांनी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, महानगरपालिका आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. याबाबत नगरसेवक लक्ष्मण उंडे यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
व्हीएस न्यूज - दुचाकीवरील चोरट्यांनी धारदार शस्त्राने पादचारी तरूणावर वार करून 2 हजार किंमतीचा मोबाईल लांबविला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास एमआयडीसीतील बोऱ्हाडेवाडीतील स्मार्ट हार्डवेअर दुकानासमोर घडला.
गोविंद भोसले (वय 22, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) याने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंद हा पायी जात होता. यावेळी दुचाकीवरील दोघांनी गोविंदचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र गोविंद मोबाईल देत नसल्याने चोरट्यांनी त्याच्या डोक्यात, पायवर आणि छातीवर शस्त्राने वार करुन जखमी केले. त्यानंतर तरुणाचा मोबाईल घेऊन पळून गेले.भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - कोयना एक्सप्रेसच्या धडकेत एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या मयत महिलेचे वय 35, तर मुलगा व मुलीचे वय अंदाजे सात वर्ष आहे. अपघातातील मृतांची ओळख पटलेली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लोणावळ्यावरून पुण्याला जाणाऱ्या लोकलमधून पिंपरी रेल्वे स्टेशनवर उतरली. यावेळी लोकलच्या पाठीमागून रुळ ओलांडणाऱ्या या महिलेला व मुलांना लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचा अंदाज आला नाही. एक्सप्रेसच्या धडकेत या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर तीनही मृतदेह शवविच्छेदनाकरिता वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातानंतर भाजी मंडईजवळील उड्डाणपुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुक कोंडी झाली होती.
व्हीएस न्यूज – तीर्थक्षेत्र आळंदीत मंगळवारी (दि.14) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 722 व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरी होत आहे. राज्य परिसरातून या सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. प्रारंभी श्री गुरु हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा परंपरेने जयघोषात झाली. भाविकांच्या अखंड हरिनामाने अलंकापुरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.
दरम्यान, नवमीनिमित्त रविवारी (दि.12) माउली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमात श्रींना पवमान अभिषेक व दुधारती, भाविकांचे महापूजा, महानैवेद्य, विना मंडपात बाबासाहेब देहूकर यांच्या कीर्तन सेवे नंतर धुपारती व त्यानंतर वासकर महाराज यांच्या वतीने परंपरेने कीर्तनसेवा रुजू झाली. दशमी दिनी उद्या सोमवारी (दि.13) माउली मंदिरात श्रीना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा, श्रींना महानैवेद्य, विना मंडपात ह.भ.प.गगुकाका शिरवळकर आणि ह.भ.प.धोंडोपंतदादा अत्रे यांच्या वतीने कीर्तन सेवा, धुपारती नंतर ह.भ.प.वासकर महाराज आणि ह.भ.प.वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे कीर्तन सेवा हरीनाम गजरात होणार आहे. भाविकांना आळंदी कार्तिकी यात्रेत कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, जागर अशा धार्मिक उपक्रमातून श्रवण सुखाची पर्वणी लाभली आहे. यात्रेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा माउली मंदिरात सुरु आहे. यास भाविक वारकरीही भक्तीभाव जोपासत हजेरी लावताना दिसत आहेत.
मंगळवारी (दि.14) सोहळ्यात कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. या निमित्त पहाटे पवमान अभिषेक, दुधारती, 11 ब्रम्हव्रुन्दाच वेदमंत्र जयघोष, श्रींना महानैवेद्य, श्रींचे पालखीची नगर प्रदक्षिणा, धुपारती, परंपरेने ह.भ.प.संतोष महाराज मोझे यांचे वतीने जागर होणार आहे.
शासकीय यंत्रणांची लगबग…
आळंदी पालिका, आळंदी देवस्थान, पुणे महसूल, पुणे शहर व ग्रामीण पोलीस, राज्य आरोग्य सेवा, महावितरण सेवा, विविध सेवाभावी संस्था यांच्या वतीने भाविक-नागरिक यांच्यासाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी अंतिम टप्प्यात लगबग दिसत आहे. आळंदी मंदिर, इंद्रायणी नदीघाट परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्षवेधी ठरली आहे. ठिकठिकाणी राहुट्यांमधून भजन, कीर्तन, प्रवचन सेवेत रंग भरला आहे. आळंदी प्रभावी स्वच्छता गृहात व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदीत यंत्र काळात मोफत सुविधा ठेवण्यात आली आहे. भाविकांच्यात नाराजी निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची स्नानास गर्दी…
प्रदक्षिणा रस्ता आणि गोपाळपुरा,जुना आणि नवीन पूल परिसरात वारकऱ्यांची गर्दी वाढली आहे. इंद्रायणीत स्नान केल्यानंतर भाविक माउलींच्या समाधी दर्शनासाठी मंदिराकडे जात होते.भक्ती सोपान पूल दर्शन बारीतून मोठी रांग लागली होती.महापूजेची लगबग सुरू होती.इंद्रायणी घाटावर, देऊळवाड्या बाहेर मठ,धर्मशाळा मध्ये वारकऱ्यांचे खेळ रंगले होते.वारकऱ्यांनी दिंड्यातून नगर प्रदक्षिणा केली.वारकऱ्यांचा आनंद भक्ती ओसंडून वाहत होती.माउलींचे मानाचे पालखी सोहळ्यातील दिंड्या चे आगमन आळंदीत झाले आहे.श्रीचे दर्शनासाठी भाविक गर्दी करीत होते.दुपारनंतर दर्शनास मंदिरात गर्दी देखील वाढली.केसं महाराज साखरे यांचे वतीने सुरु करण्यात आलेल्या श्रीक्षेत्र नेवासा ते आळंदी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आळंदीत आगमन देखील हरिनाम गजरात झाले आहे.
आळंदी पालिकेच्या भाविकांना सेवा-सुविधा…
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांचे साठी चेंजिंग रूमची व्यवस्था दुतर्फा करण्यात आली आहे.आळंदी पालिकेने शहरातील विविध ठिकाणची रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे पथारी व्यवसायीची दुकाने हटविल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाचे नियंत्रणात अतिक्रमणे हटाव महिमा सुरु आहे.यात्रा काळात देखील रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचनादेश देण्यात आले आहे.अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवक पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.प्रशासनाने पदाधिका-यांनी या कारवाईस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अलंकापुरीत पोलीस बंदोबस्त तैनात…
तीर्थक्षेत्र आळंदीत भाविकांच्या सुरक्षेसाठी सी.सी.टि व्ही.कॅमेरे तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.भाविक-नागरिकांच्या सुरक्षेस तसेच सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे.यासाठी माउली मंदिरात घातपात विरोधी पथकाकडून पाहणी देखील नियमित पणे करण्यात येणार आहे.शहरात रस्त्यावरील पाण्याचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी नळजोड वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.माउली मंदिर परिसरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था कायम आहे.परिसरात रहदारी वाहन प्रवासात धुळीचे साम्राज्याने धुराळा भाविकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे.यातून भाविकांची नाराजी वाढत आहे.राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देण्याची गरज भाविकांतून व्यक्त होते.
व्हीएस न्यूज - महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परवानगी देण्या अगोदर प्रशासनाने येथील पाण्यासह इतर मूलभूत सुविधा, भविष्याचा वाढता विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेऊन सर्व सुविधा निर्माण कराव्यात, अन्यथा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या त्वरित रद्द कराव्यात व परिसरात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावीत अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे, असे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भोंडवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे बंधाजयातून होणारी पाणी गळतीबाबत प्रशासनास वारंवार कल्पना देऊनसुद्धा दररोज होणाजया या पाणी गळतीकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही भोंडवे म्हणाले, रावेत प्रभागात असणा-या पाणी, वीज, रस्ते व इतर असुविधांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर याना भेटून समस्या मांडल्या आहेत परंतु प्रशासन वेळकाढूपणा करीत वेळ मारून नेत आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णांना केसपेपर देताना काऊंटर क्रमांक 4 मध्ये आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभागासाठी वेगवेगळे 10 रुपये आकारले जात असून, त्यामध्ये तेथील कर्मचारी गोलमाल करत आहेत. त्याची चौकशी करावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.
यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष माजीद शेख यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना केसपेपर देण्यासाठी चार काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यातील 4क्रमांकाच्या काऊंटरवरील कर्मचारी बाह्यरुग्ण विभागाच्या केसपेपरसाठी 10 रुपये आकारल्यानंतर पुन्हा आंतररुग्ण विभागासाठीही 10 रुपये आकारत आहेत. त्यामध्ये कर्मचारी गोलमाल करत आहेत. त्याचप्रमाणे ओळखीच्या रुग्णांना प्राधान्य देऊन त्यांना आतमध्ये बोलावून घेत केसपेपर दिले जाते. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी.
तसेच, अपघात विभागात उपचार केलेल्या जुन्या रुग्णांना पुन्हा उपचारासाठी येताना केसपेपरवर शिक्का घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी कोणतेही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने या रुग्णांना शिक्का मारून घेण्यासाठी नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वायसीएममधील कर्मचारी शिक्का मागण्यासाठी गेलेल्या रुग्णांना चांगली वागणूक देत नाहीत. त्यामुळे जुन्या केसपेपरवर शिक्का मारण्यासाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
व्हीएस न्यूज - फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. विद्यापीठाने कीर्तनकार शेलारमामा नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.शेलारमामा पुरस्कार 2006 पासून दिले जाते. या पुरस्कारासाठी घातलेल्या अटी शेलारमामा यांच्या कुटुंबियांनी घातलेली आहे. विद्यापीठाने नाही. विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही. विद्यापीठाकडून शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असून त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.तोपर्यंत शेलारमामा पुरस्कार तूर्त मागे घेण्यात आल्याची माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे.शेलारमामा हे हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु आहे. त्यांनी शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु ठेवण्यात येईल. अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरुंनी यावेळी स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - महापालिका सार्वत्रिक निवडणुक निकालानंतर 30 दिवसात 88 उमेदवारांनी निवडणुक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. त्या उमेदवारांना तीन वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिला आहे. याबाबत अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी पालिका निवडणूक विभागास पाठविली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. 23 फेब्रुवारी 2017 रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब निवडणूक विभागास सादर करणे बंधनकारक आहे. त्यानूसार 25 मार्च 2017 पर्यंत विहित मुदत देण्यात आली होती. परंतू, निवडणूक लढविलेल्या 88 उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब सादर केलेला नव्हता. त्यानूसार 88 उमेदवारांची विहित कार्यपध्दतीनूसार नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीस अनेक उमेदवार गैरहजर राहिले.
राज्य निवडणूक आयोगाने 5 जून 2010 आणि 10 ऑगस्ट 2015 आदेशान्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 10(1ई) नूसार अनर्ह करण्यात आलेल्या उमेदवारांचे आदेश राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी 88 उमेदवारांना रकाना क्रमांक 6 मध्ये नमूद आदेशानूसार तीन वर्षे कालावधीकरिता पालिका सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र करण्यात आले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002