व्हीएस न्यूज– भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील गोदावरी हिंदी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यामध्ये संवाद वाचन, नाट्यीकरण, अभिनय व परिच्छेदाचे प्रात्यक्षिक वाचन करुन दाखवण्यात आले. ग्रंथालयाव्दारे पुस्तके देवून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी सलग एक तास वाचन केले. विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. संस्थेचे अध्यक्ष एस. एस. तिवारी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. प्राचार्य आर. आर. मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनाचे महत्त्व त्यांनी भाषणातून विषद केले. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती देत त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.