व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालिका सेवेते कार्यरत असताना काही कर्मचारी कार्यालयात सकाळी हजेरी लावल्यानंतर आपले खासगी उद्योग चालविण्यासाठी निघून जात असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. अशा नियमबाह्य पध्दतीने नोकरी करून गलेलठ्ठ पगार लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा उद्योग प्रशासन करत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका वरीष्ठ लिपिकाची पोलीस चौकशी सुरू आहे. त्यांच्या बेकायदेशीर धंद्यांची माहिती गोळा करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे त्यांच्या मालमत्तेची माहिती मागितली आहे. पालिकेने दिलेले मासिक वेतन, भत्ते,बोनस, शासकीय कर्ज व त्याची परतफेड, जीपीएफ कर्ज व त्याची परतफेड याबाबतची माहिती मागितली आहे. परंतु, ही माहिती देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब लावत आहे. ही माहिती दडवून पालिका प्रशासन संबंधित लिपिकाला यांना पाठिशी घालत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिखली येथील कर संकलन विभागात वरीष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेला हे कर्मचारी दररोज कार्यालयीन वेळेत हजेरी लावण्यासाठी कार्यालयात येतात. हजेरी लावल्यानंतर ते त्यांचे खासगी उद्योग पाहण्यासाठी निघून जातात. त्यांची दैनंदिनी अशीच निघून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे प्रशासनाला माहिती असताना देखील वरीष्ठ अधिकारी त्यांना पाठिशी घालत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना काम न करता मासिक वेतन, भत्ते, शासकीय कर्ज आदी तत्सम फायदे दिले जातात. पालिकेच्या पैशावर मस्तवालपणा करणारे कर्मचारी नियमबाह्य पध्दतीचे कामकाज रेटत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज असताना प्रशासन त्यांना पाठिशी का घालत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर संशय निर्माण झाला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002