Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी मच्छिंद्र चिंचोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेसंत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी- चिंचवड

सांगवीत बालशिक्षण परिषदेचे तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन

· 41 reads

सांगवीत बालशिक्षण परिषदेचे तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्यअधिवेशनाचे (27 ते 29 ऑक्टोबर) आयोजन करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्‍येष्ठ बालशिक्षणतज्‍ज्ञ प्रा. रमेश पानसे, म.बा.शि.प. कार्याध्यक्ष डॉ. दिनेश नेहेते, सांगवी केंद्राच्या अध्यक्ष मेघना बाक्रे, कार्याध्यक्ष नझीर जमादार, त्रिवेणी पावसे, नीता सणस आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र बालशिक्षण ही संस्था १९९४ साली स्थापन झाली. या संस्थेचे कार्य बालशिक्षणाचा शास्त्रीय विचार जनतेपुढे आणणे हे आहे. बालशिक्षण परिषद जनजागृतीचे कार्य, गेली २४ वर्षे सातत्याने करीत आहे. प्रकाशन, प्रशिक्षण, प्रदर्शन आणि व्याख्यानाद्वारे समाजातील सर्व घटकांना बालशिक्षणाची शास्त्रीय माहिती देण्याचा परिषद प्रयत्न करीत आहे, असे प्रा. पानसे यांनी सांगितले.

Your ad here

दरवर्षी परिषदेतर्फे बालशिक्षण हा केंद्रबिंदू ठेवून एक राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते,शिक्षक, संस्थाचालक, पालक, स्वखर्चाने उपस्थित राहतात. यावर्षीचे हे अधिवेशन 'संस्कृती हॉल' नवी सांगवी, पुणे येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी 'बालशिक्षणाचे तंत्र व तंत्रज्ञान'हा महत्वाचा विषय निवडण्यात आलेला आहे. या विषयावर अनेक शिक्षक, संस्थाचालक, कार्यकर्ते शोधनिबंध सादर करणार आहेत, अधिवेशनाचे स्वरूप पूर्णपणे बौद्धिक स्वरूपाचे असून, शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांचे प्रदर्शन हा ही एक महत्वाचा भाग असेल या अधिवेशनासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओद्वारे शुभसंदेश पाठवलेला आहे. उद्घाटनासाठी वसुधा कामत, माजी कुलगुरू एस्.एन्.डी.टी. विद्यापीठ तसेच पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी बजरंग आवारी, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात गुणवत्तावाढ आणि कार्यसुलभतेसाठी तंत्रज्ञान - संस्थाचालकांचे अभिनव प्रयोग या विषावरील चर्चासत्र होणार असून त्‍यास शिवाजी माने, कोल्‍हापूर येथील नीतू बावडेकर, जयश्री घाटगे आदी सहभागी होणार आहेत. तसेच ग्राममंगलचे प्रसाद मणेरीकर यांचे व्याख्यान,बालशिक्षणाची वाटचाल याविषयावरील चर्चासत्रात प्रसाद जोशी, नेहा जमदग्नी, मंगला जोशी आदी सहभागी होणार आहेत.

शनिवारी (28 ऑक्टोबर) शोधनिबंध वाचन यामध्ये तंत्रज्ञान पर्यायी नव्हे, पूरक साधन याविषयावर चित्ररेखा जाधव, सुरेखा सोनार, रोहिणी घोंगडे आदी सहभागी होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज मीठभाकरे असतील. त्‍यानंतरच्या सत्रामध्ये मृदुला धोंगडे, संजय अष्टेकर, वैशाली सूर्यवंशी, यांच्या शोधनिबंधाचे वाचन तर लोणावळा येथील मनःशक्‍ती केंद्राचे प्रमोद शिंदे यांचे व्याख्यान, दुपारच्या सत्रात नीलेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रज्ञान वापर-इतरांचे प्रयोग-आपले शिक्षण याविषयावरील शोधनिबंध सादर होतील रेखा पाटील,नितीन माळी, रुपाली पाटील हे यामध्ये सहभागी होतील. अधिवेशनाचा समारोप रविवारी होईल. या कार्यक्रमास राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे व्यवस्थापक श्री. विवेक सावंत उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनातील उपस्थित सदस्यांसाठी निवास, भोजन व्यवस्था तसेच संपूर्ण जागा व कार्यक्रमव्यवस्था यासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या सांगवीतील शिक्षणसंस्थेने प्रायोजकत्व घेतेलेले आहे. सर्व शिक्षणप्रेमींनी तीनही दिवस अधिवेशनास उपस्थित राहून या विषयातील शिक्षणविषयक नवीन माहिती घ्यावी आणि बालशिक्षणाचे स्वरूप शास्त्रीयपद्धतीचे होण्यासाठी जमेल ते कार्य करून या चळवळीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रशांत शितोळे, प्रा. रमेश पानसे तसेच कार्यक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.

Your ad here