व्हीएस न्यूज - महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला आरडा-ओरड करून धक्काबुक्की करणाऱ्या तरूणावर वाकड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरूवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास वाकड येथील, प्रिस्टाईन प्रोलाईफ मधील महावितरणच्या कार्यालयात घडला.
राहूल भट्ट (वय-34, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश नाईकवाडे (वय-42, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल कामानिमित्त महावितरणच्या कार्यालयात आला होता. नाईकवाडे यांना मोठ-मोठ्याने बोलून त्याने त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे राहूलवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार बी. के. राठोड अधिक तपास करत आहेत.