दिलीप वळसे-पाटील यांना कृषी वैभव जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पिंपरी चिंचवड
2018-02-09
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र साहित्य परिषद व शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राजुरी येथे येत्या रविवारी कृषी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विधानसभेचे माजी सभापती, आमदार दिलीप वळसे-पाटील यांना कृषी वैभव जीवनगौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राजुरी य़ेथे उद्या (रविवार) सायंकाळी सहा वाजता वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनास प्रा. प्रशांत मोरे, भरत दौंडकर, संदीप जगताप, रवी पाईक, तुकाराम धांडे, नारायण पुरी, अरूण पवार आदी कवि सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे, आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष मुकुंद आवटे, जी. के. औटी आहेत. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुनिल महाजन, भाऊसाहेब भोईर यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती रोहित खर्गे यांनी दिली.