चिंचवड येथील दीपक रास्ते किर्तनभास्कर पदवीने सन्मानित
चिंचवड
2018-02-09
व्हीएस न्यूज - : चिंचवड येथील सुप्रसिद्ध किर्तनकार दीपकबुवा रास्ते यांना पुणे येथील श्रीहरि किर्तनोत्तेजक सभेने 'किर्तन स्वरभास्कर' या पदवीने गौरविण्यात आले. नुकत्याच झालेल्या महर्षि वेदव्यास नारदीय किर्तन संमेलनात त्यांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप आहे. हे संमेलन प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात घेतले जाते. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये अनेक पुरुष, महिला आणि युवायुवती किर्तनकार सहभागी होत असतात. त्यांच्या सादरीकरणानुसार त्यांना पदवी बहाल करण्यात येते.