व्हीएस न्यूज - तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या पाच तरुणांनी हॉकी स्टिकने रस्त्यावर उभी केलेली पाच वाहने आणि चार ते पाच दुकानांच्या काचाची मंगळवारी रात्री तोडफोड केली होती. याप्रकरणी तीन आरोपींनी अटक केली असून त्याचे दोन साथीदार पसार आहेत.
ऋषी प्रमोद कांबळे (वय-19, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड), विशाल अंबादास मंजुळकर (वय-19), सागर अशोक वाघमारे (वय-19, दोघेही रा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. चेतन नंदकुमार वरकड (वय-21, रा. महात्मा फुलेनगर), अजय कांबळे (वय-20, रा. रूपीनगर, निगडी) हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी नितीन चिलेकर (वय-41, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता दुचाकीवरून पाच आरोपी मोहनगरमध्ये आले. त्यांनी चिलेकर यांच्या श्री गणराज सुपर मार्केट दुकानात येऊन त्यांना धमकी दिली. गल्ल्यातील 4 हजार 300 रूपये जबरदस्तीने काढून घेतले. शो-केशची व दुकानासमोर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. जीवे मारण्याची धमकी देत विनायक येवले यांच्या ऑफिसच्या काचेची तोडफोड करून 60 हजार रूपयांचे नुकसान केले. फौजदार सागर पाटील अधिक तपास करत आहेत.