अजंठानगरमधील उमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री साजरी
पिंपरी चिंचवड
2018-02-16
व्हिएस न्यूज - उमेश्वर महादेव मंदिराचा 36 वा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त मंडळाचे उपाध्यक्ष हिरामण कवळे यांच्या हस्ते रूद्र अभिषेक, पंचआरती करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष रामदास बंडलकर, पुजारी दिलीप कांबळे यांच्या हस्ते गोरक्ष धुनिवर जगाच्या कल्याणासाठी होमहवन करण्यात आले. यावेळी महंत सुलतान खोकर, सुरेश खोकर, रामचंद्र राठोड, दिनकर पाचकुडे, नामदेव समिंदर, मयुर जयस्वाल, रमेश पवळ, महादेव वाघमारे आदी उपस्थित होते. उत्तरपुजा अच्युत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. महाप्रसादाचे वाटप भानुनाथ अवघडपीर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश भालेराव, बाबासाहेब गजरमल, मिथुन सारवान, सुगिव डमरे आदींनी परीश्रम घेतले.