व्हीएस न्यूज - जिन्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीचा कॉक सुरू करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.
चंद्रप्रभा अंबादास आबडेकर (वय-65, रा. पोटे वसाहत, सखुबाई गार्डनजवळ, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रप्रभा आंबेडकर दररोज सकाळी व संध्याकाळी पाण्याचा कॉक चालू-बंद करत होत्या. बुधवारी सकाळी त्या कॉक सुरू करण्यासाठी गेल्या. आणि तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडल्या. बराच वेळ झाला तरी चंद्रप्रभा परत आल्या नाहीत म्हणून घरच्यांनी बघितले असता, त्यांची एक चप्पल टाकीबाहेर पडलेली आढळली. टाकीत बघितले असता, त्यांचा मृतदेह आढळून आला.
भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.