व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या एका पादचाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवून 2200 रूपये लुटले. हा प्रकार दि. 12 फेब्रुवारी रोजी भोसरीतील गुळवे वस्ती येथे घडला.
अनिल सरदार (वय-33, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सरदार 12 फेब्रुवारी रोजी गुळवे वस्ती येथून पायी जात होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील दोन हजार दोनशे रूपये जबरदस्तीने काढून घेत पसार झाले. फौजदार कठोरे अधिक तपास करत आहेत.