व्हीएस न्यूज - बॅकेतून पैसे घेवून बाहेर आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर दोघांनी खाज येणारी पावडर टाकली. पावडर धुण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या ज्येष्ठाकडील सव्वा लाख रूपयांची रोकड, पासबुक असलेली बॅग पळवून नेली. ही घटना भोसरीतील चांदणी चौकातील मेघदुत हॉटेलमध्ये मंगळवारी भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास घडली.
तुकाराम साळवी (वय-64, रा. प्राधिकरण, आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी माहिती दिली. साळवी हे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास चांदणी चौकातील देना बॅंकेतून एक लाख 23 हजार रूपये काढून बाहेर आले होते. बॅकेच्या बाहेर काही अंतरावर आल्यानंतर दोघांनी त्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकली. साळवी पावडर साफ करण्यासाठी मेघदुत हॉटेलमध्ये गेले. साळवी यांनी पैशांची बॅग पाण्याच्या कुलर जवळ ठेवून अंगावरील पावडर साफ करत होते. पाठीमागून आलेल्या एका आरोपीने सव्वा लाख रूपयांची रोकड व पासबुक असलेली बॅग घेवून पोबारा केला. साळवी यांनी आरडा-ओरड केली तोपर्यंत आरोपी पसार झाला.
फौजदार चामले अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002