व्हीएस न्यूज - बहिणीच्या शोधात आईसोबत चाललेल्या तरुणीचा बाप-लेकाने विनयभंग केल्याची घटना काळेवाडी येथे घडली.
याबाबत 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी आपल्या आईसोबत बहिणीच्या शोधात काळेवाडी येथे जात असताना दोन इसमांनी घरगुती भांडणाच्या कारणावरून तिचा विनयभंग केला. आरोपीने पीडितेच्या शरीराचा चावा घेतला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.