व्हीएस न्यूज - 12 वी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण शुभेच्छांच्या रूपाने कमी व्हावा, परीक्षेचा उत्साह वाढावा या दृष्टीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व उपस्थित प्राध्यापकांनी पुरंदर परिसरातील केंद्र क्र्रमांक 171 मध्ये आलेल्या 12 वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली.
यावेळी महाविद्यालयाचे उपकेंद्र संचालक प्रा. जांभळे, प्रा. भगवान, प्रा. जिरापुरे आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक षिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. माया गायकवाड व प्रा. दिपक जांभळे यांनी एचएससी बोर्डाकडून आलेल्या सर्व सूचना व माहिती दिली. इ. 12 वी तील पुर्वाराणी जगताप हिने बोर्डाने दिलेली कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रतिज्ञेचे वाचन केले. यामध्ये आपण एक परीक्षार्थी असून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आई वडीलांनी जे संस्कार केले त्याचे स्मरण करून ही परीक्षा देईन, वर्षभरात केलेल्या अध्ययनावर आधारीत परीक्षा देईन. परीक्षा मोकळया वातावरणात देईन तसेच या परीक्षेत माझ्याकडून कॉपी किंवा अन्य गैरमार्गाचा वापर होणार नाही अशा आशयाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी देखील यावेळी शपथ घेतली. या कल्पनेचे पालकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002