शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनास विद्यार्थ्यांची भेट
पिंपरी चिंचवड
2018-02-22
व्हीएस न्यूज - शिव जयंती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी लढाईस 353 वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधत वसंत चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक पत्रे, युध्द नौकांच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनास राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
हे प्रदर्शन पुण्यातील बालगंर्धव रंगमंदिर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना गुराब, गलबत, युध्दनौका, व पाल या लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती, ढाल, तलवार, कट्यार, कुकरी, भाले, मुल्हेरी मूठ, दांडपट्टा, संगीन, अंकुश कुऱ्हाड, गुप्ती पेशकबज, खंजराली, जंबिया यासारखी शस्त्रे पाहता आली.
एकदिवशीय प्रदर्शन भेटीचे आयोजन प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. श्रेया दाणी, प्रा. सविता वीर, डॉ. सीमा काळभोर यांनी केले होते.