व्हीएस न्यूज - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायीक सामाजिक बांधिलकीचे माध्यमातुन मे. एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे वतीने विदयार्थीनींकरिता सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या 9 माध्यमिक शाळांमध्ये वेडींग मशीन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सीनरेशन मशिन बसविण्यात आले.
या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, नगरसेवक सागर आंघोळकर, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुध्द, एस. श्रीधरन, डेप्युटी मॅनेजर निमा गिध, सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, शाळेचे मुख्याध्यापक वडगणे एस.डी, सहा. आरोग्याधिकारी व्हि. के. बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई उपस्थित होते.
यापुर्वी आकुर्डी, काळभोरनगर, रूपीनगर, श्रमीकनगर निगडी येथील माध्यमिक शाळेमध्ये हे मशीन बसविण्यात आले आहे. पिंपळेगुरव, थेरगांव, क्रिडाप्रबोधिनी, केशवनगर व पिंपळे सौदागर येथे या वर्षात कंपनीच्या वतीने सीएसआर अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वेंडींग व इन्सीनरेशन मशीन बसविण्यात आले आहे.
एक्साईड इंडस्ट्रीज लि. यांनी पिंपळेगुरव माध्यमिक विदयालयामध्ये बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन वेंडीग व इन्सीनरेशन मशीनचे महानगरपालिकेस प्रातिनिधीक स्वरुपात हस्तांतरण आज करण्यात आले. व्हेन्डींग मशीनमध्ये 5 रु चे नाणे टाकलेनंतर एक सॅनीटरी नॅपकिन मिळते. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकिन इन्सीनरेशन मशीनमध्ये टाकलेनंतर ते साधारण 15 मिनिटामध्ये शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट होऊन त्याची राख ऍश ट्रे मध्ये राहते. मशिनला असुन धुर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले आहे. मशीनसाठी तीन लाख 21 हजार पाचशे रूपयांचा खर्च सीएसआर तत्वावर प्रायोजक कंपनीमार्फत करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी सी.एस.आर अंतर्गत उदयोजक, व्यापारी, कार्पोरेट कंपनी, सेवाभावी संस्था यांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002