व्हीएस न्यूज - येथील जयवंत इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसी कॉलेजचा प्रथम पदविका प्रदान सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा रंगला. यावेळी जेएसपीएम ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ पी.पी विटकर, इंडोफिल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ जयंत चांदोरकर, प्राचार्य प्रा प्रशांत हंबर, कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा वर्षा कटारे आदी उपस्थित होते.
डॉ चांदोरकर म्हणाले कि, पूर्वीपेक्षा हल्ली फार्मसी क्षेत्रात मोठे बदल झाले. मुलांचा कल वाढला आहे. या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. यावेळी ज्योती चौधरी संपादित कॉलेज कट्टा या ई मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले. सहभागी झालेल्या 350 माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत मार्गदर्शन केले. नृत्य, नकला असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. दिवसभराच्या कार्यक्रमात निकिता कुंभार, ममता चौधरी, कोमल महाडिक, गीता चौधरी, दिव्या चौधरी, निशा सोनवणे यांनी सुत्रसंचालक केले.
प्रा. सुधा पुरी यांनी आभार मानले. माजी विद्यार्थी संघटनेचे धवल घुगे यांनी अहवाल सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा सविता देवकर, प्रा देविका टिळेकर, प्रा संगीता गवळी, महेश खुडे, जयकुमार गोपाळे, कांचन सोनी, दीपाली भांडवलकर, दिपाली घाडगे, कोमल टेकाळे, वंदना पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002