व्हिएस न्यूज - महापालिकेच्या वायसीएममधील एका डॉक्टर महिलेसह देशभरात अनेक महिलांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या एका नायजेरियनच्या भोसरी पोलिस व सायबर सेलने मुसक्या अवळल्या आहेत. तसेच आरोपीच्या पासपोर्टची 12 मार्च 2017 रोजी मुदत संपली होती. तो भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होता.
अरिरिका हेंन्री अजुबुके (वय-38) असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. प्रतिभा शामकुवर यांना फेसबुकच्या माध्यमातून अजुबुके याने तब्बल 41 लाख 82 हजार रुपयांचा गंडा घातला होता. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच्या फिर्यादीवरून पुणे सायबर सेल व भोसरी पोलीसांच्या पथकाने कसून तपास केला. अखेर आरोपी अजुबुकेला दिल्लीतून अटक केली.
त्याने फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिलांना गंडा घातल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. अजुबुके याने बंगळुरु येथील एका महिलेला 60 लाख, कुलू मनाली येथील महिलेला 30 लाख, वसई येथील महिलेला 8 लाख, निगडी येथील एका महिलेला 5 लाख तर तक्रार करणाऱ्या डॉक्टर महिलेला 42 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आले आहे.
भोसरी पोलीस व सायबर सेल अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002