व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहत्रक बनविण्याऱ्या कंपनीला आग लागली. तर, रहाटणीत गणेश बॅंकेला लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक झाली. या दोन्ही घटना शनिवारी सकाळी घडल्या.
तळवडे येथे विद्युत रोहत्रक बनविण्याची कंपनी आहे. कंपनीत फॅब्रिकेशनचे काम सुरु होते. त्यावेळी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. पिंपरी, संत तुकारामनगर येथील दोन बंब, भोसरी आणि प्राधिकरणातील एक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. यामध्ये आर्थिक नुकसान झाले आहे.
दुसरी घटनी रहाटणी येथे घडली. रहाटणी येथील गणेश बॅंकेला शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत बॅंकेतील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. रहाटणी अग्निशामक उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत बॅंकेची चलन व इतर कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002