व्हीएस न्यूज - मराठी भाषा गौरव दिन व जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक मराठी विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांंना शिक्षणाबरोबरच अर्थाजनासाठी विविध उपक्रमाविषयी माहिती देत मोडी लिपी मधून करिअर करता येते हे ही सांगितले. आज लाखो मोडी लिपीतील कागदपत्रे अभ्यासकांची वाट पहात आहेत. या अशा अभ्यासक्रमातून पुढे अभ्यासक निर्माण व्हावेत असा आमचा प्रयत्न असल्याच्या त्या म्हणाल्या. श्यामला पानसे गेली आठ वर्षे येथे मोडी षिकवित आहेत त्यांचे आभार व्यक्त केले.
या प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या श्यामला पानसे म्हणाल्या की, 1935 मध्ये मोडी लिपी बंद झाली. पण अनेक जुने कागदपत्रे, वारसाहक्काची, जमिनीची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्याचे देवनागरीत रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप संधी आहे. इतिहासाचे कागद बोलत असतात आणि मोडी हा त्याचा मार्ग असल्याचे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट यांनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संगिता लांडगे यांनी तर आभार प्रा. दुर्गा भिसे यांनी मानले. डॉ. धनंजय वाघमारे, डॉ. संगिता लांडगे यांचे सहकार्य लाभले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002