व्हीएस न्यूज - दुचाकीवरुन तोंड बांधून आलेल्या दोघांनी समोरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणाच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीची सोनसाखळी भरदिवसा हिसकावून नेली. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीगावात घडली.
मच्छिंद्र काटे (वय 28, रा. पिंपळे सौदागार) असे सोनसाखळी चोरीला गेलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिंपरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आंतरकर यांनी माहिती दिली. मच्छिंद्र हा शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीगावातून दुचाकीवरुन पिंपळे सौदागरकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून प्लसर या दुचाकीवरुन तोंड बांधून आलेल्या दोघांनी त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची 90 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.