व्हीएस न्यूज - चऱ्होली येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट व स्कूल ऑफ एमसीए आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27,27 फेब्रुवारी रोजी संयुक्त समकालीन धोरण: जागतिक दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिसवांदाचे आयोजन केले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चऱ्होली येथील डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात सकाळी 11 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे संस्थापक डॉ अजिंक्य डी वाय पाटील व आय. आय. एम. तिरुचिरापल्ली चे संचालक डॉ भीमराया मेत्री यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी केबांग्सन मलेशिया विद्यापीठाचे विशेष अतिथी डॉ जॉन अंतोनी झेवियर मॉरिशस देशाच्या डॉ अनिता रामागत्ती वौंग , कॅनडा देशाचे डॉ कृष्णलाल, मौरीशस देशाचे डॉ महेंद्रनाथ मोटा, कोलंबो श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा हे मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत श्रीलंकेच्या आरोषा जेनिफर मेरी, बांगलादेशाचे डॉ सैफुल मजीद, जाफना विद्यापीठ श्रीलंकेचे डॉ बी निमालाथासन, जपान देशाचे तोमियो एसोगयी, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडूचे डॉ एस. पंचानाथम आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच विविध क्षेत्रामधील भारतातून व इतर देशातून अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी आवाहन केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002