व्हीएस न्यूज - बेपत्ता तरुणाचा मृतदेह ओटा स्किम येथे एका इंडिका मोटारीमध्ये आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
राहुल खुळे (रा. ओटा स्कीम, निगडी), असे मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा शनिवारपासून बेपत्ता होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील ओटा स्कीम येथे सोमवारी सकाळी एका
इंडिका मोटारीत मृतदेह असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राहूल शनिवारपासून बेपत्ता होता. राहूलचा खून झाला आहे की आत्महत्या केली आहे याचा शोध घेण्यात येईल, असे पोलीसांनी सांगितले.
निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.