व्हीएस न्यूज - कंपनीतील डिझेल फ्युअल इंजेक्टर चोरणाऱ्या एका कामगाराला अटक करण्यात आली आहे.
किरण पांडुरंग शिंदे (वय 19, रा. केळगाव, आळंदी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सोन्नप्पा देशमुख (वय-58, रा. लोहगाव, पुणे) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी डिव्हिजन मध्ये काम करतो. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुसरी शिफ्ट संपवून घरी जात होता. किरण पिशीवून काही घेवून जात असल्याच्या संशयावरून कंपनीतील सुरक्षारक्षक सोनप्पा देशमुख यांनी त्याला हटकले. व त्याची पिशवी तपासली असता त्यामध्ये कंपनीतील सुमारे 24 हजार रुपयांचे 12 डिझेल फ्युअल इंजेक्टर होते.
फौजदार श्रीकांत शेंडगे अधिक तपास करत आहेत.