व्हिएस न्यूज – रस्ते, वाहतुक व्यवस्था या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे ही व्यवस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्यक सुविधा देण्याचा आमचा भर आहे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे बिजलीनगर येथे उभारण्यात येणारा भुयारी मार्ग (अंडरपास), केशवनगर –काळेवाडी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा दुसरा टप्पा, चिंचवड– काळेवाडी पुलापासून भाटनगर मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत प्रस्तावित १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ता आदी प्रमुख कामांचे भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, मावळत्या स्थायी समिती सभापती सीमाताई सावळे, नगरसेवक नामदेवराव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, करुणाताई चिंचवडे,माधुरी कुलकर्णी, संगिता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, सारंग कामतेकर, ॲड. मोरेश्वर शेडगे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, शंकर पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवक ढाके म्हणाले, बिजलीनगर येथील चौकात छोटे – मोठे अपघात होत होते. अनेक वर्षांपासून येथे भुयारी मार्ग करण्याची मागणी होती. ती पूर्ण होणार आहे. तसेच, प्रभाग १७ मधील विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ब प्रभागातंर्गत होणाऱ्या विकास कामांमधून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. येथील प्रस्थापित भुयारी मार्गाने नागरिकांचा मार्ग सुखकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002