व्हीएस न्यूज - मोरवाडी न्यायालयात एका पक्षकाराने न्यायालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप साबळे यांनी प्रसंगावधान दाखवत त्याला आत्महत्येपासून वाचविल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास घडला.
अरविंद बबन कसबे (रा. निगडी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद कसबे या तरुणाचे 28 मे, 2013 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर कौटुंबिक वादातून त्याच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. मागील एक वर्षांपासून मोरवाडी न्यायालयात त्याचा खटला सुरु आहे. त्याला साडेतीन वर्षांची मुलगी असून मुलीला दर शनिवारी भेटण्यासाठी त्याने न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. मात्र पत्नी, सासू, सासरे त्याला मुलीला भेटू देत नाहीत. पत्नीला नांदण्यासाठी विनंती करूनही पाठवित नाहीत. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला.
न्यायालयाच्या बाहेर त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. न्यायालयामध्ये आत पोर्चमध्ये येऊन थांबला. त्यानंतर त्याने खिशातून काडीपेटी काढत काडी ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका केससंदर्भात वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप साबळे
तेथे उपस्थित होते. त्यांचे कसबे याच्याकडे लक्ष गेले. साबळे यांनी प्रसंगावधान दाखवत कसबे याला पाठीमागून पकडल्याने मोठा अनर्थ टळला. कसबेला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तो गरीब असल्या मुळे वकील देऊ शकत नाही म्हणून अॅड.अतिश लांडगे (रिमांड वकील पिंपरी न्यायालय) व त्यांच्या सहकार्यांनी मोफत वकील पत्र दाखल केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002