व्हिएस न्यूज - भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच्या सुमारास चिंचवड, देना बॅंकेजवळ घडली.
नितीन भिकोबा ओझरकर (वय-31, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांचा पुतण्या राहुल ओझरकर (वय-29) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रक चालक नारायण रामभाऊ डोईफोडे (वय-25, रा. ईटगाव, पिंपळनेर, बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून मोशीकडून चिंचवड स्टेशनकडे जात होते. देना बॅंकेजवळ त्यांच्या मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. नितीन यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
फौजदार बोचरे अधिक तपास करत आहेत.