महिला दिनानिमित्त नृत्य, गायन, वादन स्पर्धांचे आयोजन
पिंपरी चिंचवड
2018-03-09
व्हिएस न्यूज- जागतिक महिला दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रायलय, भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्य, गायन, वादन स्पर्धांचे 30 व 31 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी नंदकिशोर कल्चरल सोसायटी, सेक्टर 21, यमुनानगर, निगडी येथे किंवा 9371099911 या क्रमांकावर संपर्क साधून करावे. नृत्य स्पर्धेत शास्त्रीय नृत्य, फिल्मीनृत्य, वेस्टर्न नृत्य, गायनात शास्त्रीय व सुगम संगीत तर वादनात तबला, हार्मोनियम, सतार अशा विविध गटात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रायलय, भारत सरकारतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नंदकिशोर कपोते यांनी दिली.