व्हिएस न्यूज -पिंपरी पोलीसांनी केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले. याप्रकरणी तीन अल्पवयीनांसह पाच जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 13 दुचाकी, तीन एलईडी टीव्ही आणि दोन मोबाईल फोन असा पाच लाख, 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
किरण उर्फ दाद्या गौतम शिंदे (वय-21, रा. साई मंदिराजवळ, गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. चोरीच्या वस्तू विकत घेणारा चाचा ऊर्फ शहजाद गफार खान (वय-46, रा. तळेगाव दाभाडे) यालाही पोलीसांनी अटक केली आहे.
आरोपी किरण शिंदे याच्याकडून एक लाख, 90 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चंदननगर, वाकड, सांगवी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
दोन अल्पवयीन मुले वडगाव, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव या भागात घरातील एलईडी टीव्ही, मोबाईल फोन अशा वस्तूंची चोरी करीत होते. चोरी केलेले साहित्य ते तळेगाव येथील चाचा उर्फ शहजाद गफार खान याला विकत होते. पोलिसांनी खानकडून सात दुचाकी व तीन एलईडी टीव्ही असा एकूण दोन लाख, 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोघांवर पिंपरी तीन, भोसरी एमआयडीसी दोन, दौंड आणि पंढरपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे दाखल आहेत. तसेच आणखी एका अल्पवयीन मुलाकडून 40 हजार रूपये किंमतीची होंडा ऍक्टीव्हा दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
तीन अल्पवयीनांसह पाच जणांकडून 13 दुचाकी, तीन एलईडी टीव्ही आणि दोन मोबाईल फोन असा पाच लाख, 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे आदींनी केली.
फोटो- पोलीस नावाने
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002