व्हिएस न्यूज - ओळख असलेल्या एकाने दुचाकी नेली. दुचाकीच्या चावीबरोबर असणाऱ्या घराच्या चावीची बनावट चावी बनवून घरातील अडीच लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली आहे.
श्रीमंत शिवाजी गंभीरे, (वय 40, रा. श्रीकृष्ण कालनी, मांजरी), आकाश उत्तम गिरी (वय-26 वर्षे, रा-मलंग गल्ली, सराफा लाईन, लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश पुरी हा फरार आहे. याप्रकरणी नंदकुमार अरूण बनसुडे (रा. डागा रूग्णालयाजवळ, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांनी
माहिती दिली. फिर्यादी यांची श्रीमंत गंभीरे याच्याशी ओळख होती. आरोपी गंभीरे याने कामानिमित्त फिर्यादीची दुचाकी घेवून गेला होता. दुचाकीच्या चावीबरोबर फिर्यादी यांच्या घराचीही चावी होती. या चावीची बनावट चावी तयार करून आरोपी गंभीरे याने 27 फेब्रुवारी रोजी फिर्यादीचे घर उघडले. बेडरूममधील कपाटातील 2 लाख 55 हजार रूपयांचे सोन्याचे साडेआठ तोळे दागिने चोरून नेले. हे दागिने आरोपीने त्याचा मित्र आकाश गिरी याच्याकडे ठेवले होते. गंभीरे व गिरी या दोघांना सांगवी पोलीसांनी अटक केली असून त्याचा साथीदार गणेश पुरी हा फरार आहे.
सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002