तलवारीने केक कापणाऱ्या सहा जणांना अटक, सहा अल्पवयीन ताब्यात
निगडी
2018-03-09
व्हिएस न्यूज - तलवारीने केक कापून मित्राचा वाढदिवस साजरा करणाया बारा जणांवर निगडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी सहा जणांना गजाआड करण्यात आले आहे. ही घटना निगडी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.
शुभम अमर मारिया (वय 18, रा. खराळवाडी, पिंपरी) सागर शिवा शिंदे (वय18) साहिल रमजान शेख (वय18, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) संदीप मारूती लोहेकर (वय20, रा. पिंपरी) सुमीत शिवाजी कांबळे (वय 19) रामचंद्र सुनील नाफडे (वय19, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे आहेत. याशिवाय सहा अल्पवयीन मुलांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील संत कबीरदास गार्डनमध्ये काही जण तलवारीने केक कापत असल्याची माहिती निगडी पोलीसांना मिहाली. त्यानुसार, निगडी पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तलवारीच्या आकाराएवढे दोन कोयते आणि चार वाहने असा 2 लाख 40 हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त केला. सहायक फौजदार तात्या तापकीर तपास करत आहेत.