व्हीएस न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका तरूणाचा नऊ जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता, चॉपरने डोक्यात, हातावर, पायावरण वार करून खून केला. ही घटना गुरूवारी रात्री साडेदहा वाजता थेरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी वाकड पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
रुपेश सुखबीर सोराती (वय, 24 रा. गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व रूपेश यांच्यात पुर्ववैमनस्य होते. याच पूर्ववैमनस्यातून आरोपींनी रूपेश गुरूवारी रात्री साडेदहा वाजता घऱी जाताना थेरगावातील पाण्याच्या टाकीजवळ त्याला अडविले. आरोपींनी रूपेशवर लोखंडी कोयता, चॉपरने डोक्यात, हातावर, पायावर वार करून गंभीर जखमी केले. रूपेशला तात्काळ चिंचवड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सतीश माने अधिक तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002