व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एक लाख रूपयांची सोन्याची चैन हिसका मारून तोडून नेली. ही घटना जागतिक महिला दिनी सकाळी साडेआठच्या सुमारास अजमेरा कॉलनी येथे घडली.
याबाबत शैला सतिश शिराळकर (वय-76, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरीतील सिनीयर ऑफिसर कॉ. सोसायटीजवळून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 10 हजार रूपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेली.
फौजदार विठ्ठल बढे अधिक तपास करत आहेत.