व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चाकण, खेड, शिक्रापूर येथून 1500 हुन अधिक भक्त उपस्थित होते.
या कार्यक्रमात केंद्रीय प्रचारक निर्मल मनचंदा यांनी नारी शक्ती चे महत्व पटवून दिले. सदगुरूच्या गुरुसिखाची लक्षणे त्यांनी सांगितली. सदगुरुचा शिष्य हा नेहमी त्याचे स्मरण करीत असतो, तो शांत तर असतोच. परंतु जे कोणी त्याच्या जवळ येतात त्यांना हि तो शांत बनवण्याचं कार्य करीत असतो.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला भोसरी सेक्टर मधील सर्व शाखांचे मुखी, सेवादल अधिकारी, प्रबंधक उपस्थित होते. भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी आभार मानले.