व्हीएस न्यूज - घरासमोर लावलेली दुचाकी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना जुनी सांगवीत दि.10 मार्च रोजी मध्यरात्री घडली.
वैशाली रामकिशोर सिंग (वय 30, रा. बडगुजर बिल्डिंग, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जुनी सांगवी येथील बडगुजर कॉलनी येथे राहतात. दि. 10 मार्च रोजी रात्री घरासमोर लावलेली बजाज पल्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.