व्हीएस न्यूज - एका महाविद्यालयीन तरुणाला दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने धमकी देत लुटले. हा प्रकार रावेत येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला.
कुणाल लक्ष्मण मलवाडे (वय 19, रा. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बॉईज हॉस्टेल, रावेत, मूळ रा. लातूर) या विद्यार्थ्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल रावेत येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्चमध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कुणाल जेवण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर रस्त्यावर शतपावली करीत होता. दुचाकीवरून (एम एच 14, डीपी 7459) या क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने कुणालला धमकी देत तुझ्याकडे असलेला मोबाईल व पैशांचे पाकीट देण्याची मागणी केली. कुणालने याला विरोध करताच तिघांनी त्याला हाताने मारहाण करत मोबाईल व पैशांचे पाकीट असा आठ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने नेला.
देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002