व्हीएस न्यूज - वाढदिवसाला तलवारीने केक कापणे बर्थडे बॉयसह त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. बर्थडे बॉय सुरज खंडू काटेसह दहा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सुरज खंडू काटे (वय-28, रा. पिंपळे सौदागर) या तरुणाचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्थडे साजरा करताना सुरजने तलवारीने केक कापला. वाढदिवसाचे फोटो सुरजने फेसबुकवर टाकले. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानुसार आरोपींनी शस्त्रबंदीचा आदेश न पाळता त्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे या वाढदिवसाला भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह त्याचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002