व्हीएस न्यूज - आलिशान बसमधून इंदौरकडून पुण्याकडे आणण्यात येणारा 25 लाखांचा गुटखा गुरूवारी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध विभाग आणि गुन्हे शाखा यांच्याकडून करण्यात आली.
विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला असा 25 लाख रुपयांचा गुटखा, 80 लाख रुपये किंमतीच्या दोन आलिशान बसगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी गुटखा माफिया श्रीकांत चांदेकर आणि राजेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. (यूपी 75, एटी 4677) आणि (यूपी 75, एटी 4678) या क्रमांकाच्या दोन आलिशान बसगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेला सर्व माल निगडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.
ही कारवाई एफएसओ अधिकारी संतोष जाधव, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त नरगुडे, संजय दळवी यांच्या टीमने केली.