व्हीएस न्यूज - भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा गंभीर जखमी होऊऩ मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात घडली.
गणेश शंकर सगर (वय-23, रा. मानाजी बाग, भोईर वस्ती, खडकी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याचे नातेवाईक रामेश्वर मर्ढेकर (वय-27) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास गणेश दुचाकीवरून जात होता. निगडीतील अंकुश चौकात त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये गणेशचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला.फौजदार वाघमारे अधिक तपास करत आहेत.