व्हीएसन्यूज - श्री विठ्ठल रूक्मिणी प्रेरणा मंडळाच्या वतीने ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन सोहळ्याचे दि. 21 ते 28 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
प्राधिकरणातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात सकाळी आठ वाजता पारायण, सायंकाळी 5.30 वाजता हरिपाठ तर सायंकाळी 6 वाजता प्रवचन होणार आहे. यामध्ये सुरेश आगाशे, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, जयश्री सांगवीकर, ओजदा पोळ, चंद्रशेखर निलाखे, यशवंत लिमये, मधुवंती देव आदी प्रवचनकारांची प्रवचने होणार आहेत. तर शेवटच्या दिवशी ह. भ. प. नारायण महाराज आरडे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. पारायणास बसू इच्छिणाऱ्यांनी शरद अवचट 8275682164 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मोकाशी यांनी केले आहे.